हुंड्याच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल, पतीसह तिघांना अटक । Married woman commits suicide

 

हुंड्याच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल, पतीसह तिघांना अटक । Married woman commits suicide

हुंड्याच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल, पतीसह तिघांना अटक Married woman commits suicide due to dowry harassment

पुणे: हुंड्याच्या मागणीसाठी सासरच्यांकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना भोसरी येथे घडली आहे. या प्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी पतीसह सासरच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

ही घटना दि. २५/०८/२०२५ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास भोसरीतील शितलबाग परिसरात घडली. फिर्यादी संजय पुजाराम देवरे यांच्या मुलीचा विवाह आरोपी अभिजीत मुरलीधर शेळके (वय ३१) याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर अभिजीत आणि त्याचे वडील मुरलीधर दगडू शेळके (वय ६०), तसेच आई आणि बहिण यांनी फिर्यादीच्या मुलीकडे वारंवार हुंड्यासाठी पैशांची मागणी केली.

हुंड्याच्या मागणीसाठी आरोपींनी फिर्यादीच्या मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. या त्रासाला वैतागून अखेर तिने आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला.

या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी पती अभिजीत शेळके आणि त्याचे वडील मुरलीधर शेळके यांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक टापरे हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post