पुणे: अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कुटीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू, अपघात करून चालक फरार Accident near Kharabwadi village

 


पुणे: अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कुटीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू, अपघात करून चालक फरार Accident near Kharabwadi village


पुणे: खेड तालुक्यातील खराबवाडी गावाजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कुटीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातानंतर वाहन चालक मदतीसाठी न थांबता घटनास्थळावरून पसार झाला असून, त्याच्या विरोधात महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Accident near Kharabwadi village

ही घटना दि. २५/०४/२०२५ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास खराबवाडी गावाजवळ, सारासिटी रोडवर घडली. अज्ञात वाहन चालकाने त्याचे वाहन भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून स्कुटी मोटार सायकल क्रमांक एम.एच. १४ / जी.एफ. २६९८ ला धडक दिली.

या अपघातात स्कुटीस्वार मुराद मुबारक शिकलगार (वय ३६) यांच्या पोटावरून वाहनाचे चाक गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अपघातानंतर वाहन चालक मदतीसाठी न थांबता आणि पोलिसांना माहिती न देता पळून गेला. या प्रकरणी मृताच्या पत्नीने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक मुल्ला या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेबाबत कोणालाही काही माहिती असल्यास पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post