मावळ, पुणे: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना (Pune Crime News) समोर आली आहे, जिथे जमीन वादातून दोन सख्ख्या भावांमध्ये (Family Dispute) रक्तरंजित संघर्ष पाहायला मिळाला. ओझर्डे येथील वडिलोपार्जित जमिनीवरून (Ancestral Land Dispute) झालेल्या वादानंतर एका भावाने दुसऱ्या भावावर लोखंडी विळ्याने (Iron Sickle Attack) हल्ला करत गंभीर जखमी केले. शिरगाव पोलिसांनी (Shirgaon Police) तात्काळ कारवाई करत आरोपी भावाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळू दत्तू धामणकर (वय ५३, धंदा नोकरी, रा. उसे, ता. मावळ, जि. पुणे) हे दि. ०३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता त्यांच्या ओझर्डे येथील वडिलोपार्जित जमिनीवर गेले होते. त्यावेळी त्यांचा धाकटा भाऊ, आरोपी तुषार दत्तू धामणकर (वय ४४, रा. उसे, ता. मावळ) हा त्यांच्या जमिनीच्या हिस्स्यात गवत कापत होता.
जमीन वादातून वाढला वाद
बाळू धामणकर यांनी तुषारला 'माझ्या वाट्याच्या जमिनीत तू का आलास?' असे विचारले असता, तुषारने 'ही जमीन माझ्याच ताब्यात आहे' असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. हा जमीन वाद (Land Dispute Maval) इतका विकोपाला गेला की त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या तुषारने, 'तुला आता संपवूनच टाकतो' अशी धमकी (Threat to Kill) देत त्याच्या हातातील लोखंडी विळ्याने बाळू यांच्या हातावर आणि डोक्यावर वार केले. या प्राणघातक हल्ल्यात (Assault Case Pune) बाळू धामणकर गंभीर जखमी (Seriously Injured) झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात (Hospitalized) दाखल करण्यात आले आहे.
शिरगाव पोलिसांची तात्काळ कारवाई
घटनेची माहिती मिळताच शिरगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बाळू दत्तू धामणकर यांच्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी तुषार दत्तू धामणकर विरोधात भा.न्या सहिता कलम १०९ (१) आणि ३५१ (३) प्रमाणे गुन्हा (FIR Registered) दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच, म्हणजे दि. ०३ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी १७:३७ वाजता आरोपी तुषार धामणकर याला अटक (Accused Arrested) करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून (Property Dispute Maharashtra) सख्ख्या भावामध्ये झालेल्या या रक्तरंजित हल्ल्यामुळे मावळ तालुक्यात (Maval Taluka News) एकच खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वाद आणि मालमत्तेवरून होणारे संघर्ष अनेकदा गंभीर गुन्ह्यांपर्यंत जातात, याची ही घटना पुन्हा एकदा अधोरेखित करते. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.