Pune : हृदयद्रावक! येरवडा येथे रिक्षा पलटी होऊन ७८ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू


पुणे:
शहरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे होणारे अपघात थांबण्याची चिन्हे नाहीत. अशीच एक हृदयद्रावक घटना येरवडा येथे घडली असून, रिक्षा पलटी झाल्याने ७८ वर्षीय वृद्ध महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.Pune 

काय घडले नेमके? ही दुःखद घटना ११ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३:४५ वाजण्याच्या सुमारास घडली. येरवड्यातील पोस्ट ऑफिस चौक, नागपूर चाळ परिसरात एका रिक्षाचालकाने आपल्या ताब्यातील रिक्षा वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून, हयगयीने, अविचाराने आणि भरधाव वेगात चालवली.

या रिक्षातून फिर्यादींच्या ७८ वर्षीय आई, शोभाना लक्ष्मण मोहिते (रा. जाधवनगर, लक्ष्मी रेसिडेन्सी, येरवडा) प्रवास करत होत्या. भरधाव वेगातील रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने ती अचानक पलटी झाली. रिक्षा पलटी झाल्याने शोभना मोहिते खाली पडल्या आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये रिक्षाचालकाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०६, १२५ (ब), २८१ आणि मोटर वाहन कायदा कलम ११९/१७७, १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षाचालक अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. येरवडा पोलीस स्टेशनचे पो.उप.निरी. सजे (मो. ८४२१०७४३०६) या प्रकरणाचा तपास करत आहेत.

या घटनेमुळे पुन्हा एकदा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बेफिकीरपणे वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. नागरिकांनी प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post