Waiter kills hotel owner :वेटरने हॉटेल मालकाची केली हत्या; चाकूने गळा, छातीवर वार करून संपवले, आरोपीला अटक

 

पुणे: किरकोळ वादातून वेटरने हॉटेल मालकाची केली हत्या; चाकूने गळा, छातीवर वार करून संपवले, आरोपीला अटक

पुणे: पुण्यातील उत्तमनगर परिसरात किरकोळ वादातून एका वेटरने हॉटेल मालकाची चाकूने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

ही घटना दि. २६/०८/२०२५ रोजी रात्री ८:३० ते ८:४५ वाजण्याच्या सुमारास कोंढवे धावडे येथील 'पिकॉक रेस्टॉरंट अॅण्ड बार' येथे घडली. फिर्यादीचा भाऊ संतोष सुंदर शेट्टी (वय ४४) हे हॉटेलच्या काउंटरवर बसले असताना, त्याच हॉटेलमधील वेटर उमेश दिलीप गिरी (वय ३८) याच्यासोबत त्यांचे शाब्दिक भांडण झाले.

या भांडणाचा राग मनात धरून आरोपी उमेश गिरी किचनमधून चाकू घेऊन आला आणि त्याने संतोष शेट्टी यांच्या छातीवर, कानावर, गळ्यावर आणि हातावर सपासप वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने संतोष शेट्टी यांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, उत्तमनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने आरोपी उमेश गिरी याला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post