पुणे, ७ सप्टेंबर: पुणे-नगर महामार्गावरील लोणीकंदजवळ विकफिल्ड कंपनीसमोर आज सकाळी एका भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक (Accident) दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.Serious accident on Pune-Nagar highway,
काय घडले?
हा अपघात ४ सप्टेंबर, २०२५ रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास लोणीकंद येथील विकफिल्ड कंपनीजवळ, विठाई पंपासमोर घडला. लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका २८ वर्षीय तरुणाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तो त्याचा मित्र भूपेंद्रकुमार तुकमानसिंह (वय ३६) यांच्यासोबत दुचाकीवरून जात असताना, समोरून आलेल्या एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कारचालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले. भरधाव वेगात असताना गाडीच्या पुढच्या उजव्या बाजूचे टायर फुटले आणि चालकाचे नियंत्रण सुटले. याच कारणामुळे गाडी दुचाकीवर जाऊन आदळली.
या अपघातात भूपेंद्रकुमार तुकमानसिंह यांना गंभीर मार लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. फिर्यादी तरुणही जखमी झाला आहे. अपघातानंतर कारचालक कोणताही मदत न करता घटनास्थळावरून पळून गेला.
या प्रकरणी, लोणीकंद पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरोधात लोणीकंद पो.स्टे. गु.र.नं. ३५०/२०२५, भा.न्या.सं. कलम २८१, १२५(अ), १२५(ब), १०६(१) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९/१७७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक निलेश घोरपडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.