अलंकार चौकात PMPML बसची पादचाऱ्याला धडक; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, चालक फरार

 


अलंकार चौकात PMPML बसची पादचाऱ्याला धडक; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, चालक फरार

पुणे, ९ सप्टेंबर: पुणे शहरातील अलंकार चौकात (Alankar Chowk) एका भरधाव वेगातील पीएमपीएमएल (PMPML) बसने रस्ता ओलांडणाऱ्या एका तरुणीला जोरदार धडक दिली. या अपघातात (Accident) गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. बसचालक अपघात घडल्यानंतर न थांबता घटनास्थळावरून पसार झाला.

काय आहे प्रकरण?

ही घटना ७ सप्टेंबर, २०२५ रोजी रात्री ७.१५ ते ७.३० वाजताच्या दरम्यान अलंकार चौक, पुणे रेल्वे स्टेशनसमोर घडली. याप्रकरणी एका २७ वर्षीय तरुणाने बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, त्याची मैत्रीण प्रीती विद्यासागर वेंगल (वय २६) रस्ता ओलांडत असताना, एका अज्ञात पीएमपीएमएल बसचालकाने वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून बस भरधाव वेगाने चालवली.

बसवरील नियंत्रण सुटल्याने त्याने प्रीतीला जोरदार धडक दिली. या धडकेत ती गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर बसचालक कोणताही मदत न करता किंवा पोलिसांना माहिती न देता पळून गेला.

या प्रकरणी, पोलिसांनी अज्ञात बसचालकाविरुद्ध बंडगार्डन पो.स्टे. गु.र.नं. २६२/२०२५, भा.न्या.सं.क. २८१, १०६(१), १२५(ब) आणि मो.वा.का.क. १७७, १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post