Nigdi:पिंपरी-चिंचवडमध्ये ‘तलवार गँग’ पुन्हा सक्रिय? निगडीत तरुणाला तलवारीसह अटक

 

पुणे, ९ सप्टेंबर:
पिंपरी-चिंचवड शहरात पोलीस आयुक्तांनी जारी केलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करत, निगडी (Nigdi) येथील एका तरुणाला सार्वजनिक ठिकाणी तलवारीसह (Sword) फिरताना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे कोणताही अनुचित प्रकार टळला आहे.

काय आहे प्रकरण?

ही घटना ६ सप्टेंबर, २०२५ रोजी पहाटे १२.४५ वाजताच्या सुमारास निगडीतील संजय हॉटेलच्या पाठीमागील बोळात, ओटास्किम येथे घडली. निगडी पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई बाळू यमाजी यादव (ब. नं. २९५६) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रकाश उर्फ पक्या तुकाराम शिंगे (वय ३५) हा हातात ५०० रुपये किमतीची एक लोखंडी तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी फिरत होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी ३ ते १६ सप्टेंबर, २०२५ या कालावधीत शहरात घातक शस्त्रे बाळगण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. आरोपीने या आदेशाचे उल्लंघन केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्याने कोणताही दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने हे बेकायदेशीर शस्त्र बाळगले होते.

या प्रकरणी, पोलिसांनी आरोपी प्रकाश उर्फ पक्या शिंगे याला तात्काळ अटक केली आहे. त्याच्यावर निगडी पो.स्टे. गु.र.नं. ४११/२०२५, भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक भोईर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post