Fatal attack on youth in Pimpri : पिंपरीत जुन्या वादातून तरुणावर सिमेंट गटटूने जीवघेणा हल्ला, तीन आरोपींना अटक

 

पुणे, ९ सप्टेंबर:
पुणे जिल्ह्यातील पिंपरी (Pimpri) येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून चार तरुणांनी एका तरुणावर सिमेंटच्या गटटूने (Cement block) आणि काठीने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आहे. संत तुकाराम नगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून, एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.Fatal attack on youth in Pimpri

काय आहे प्रकरण?

ही घटना ५ सप्टेंबर, २०२५ रोजी रात्री ९.३० वाजता मोरवाडी, पिंपरी येथील लाल टोपीनगरमध्ये घडली. फिर्यादी विजय बन्सीलाल कुर्मी (वय ३५) यांनी संत तुकाराम नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी साहिल उर्फ बजरंग जानराव (वय २०), सार्थक कागदे (वय १९), जावेद सलीम शेख (वय १७) आणि आसिफ उर्फ सिराजुद्दीन खान (वय २०) यांनी त्याला आई-बहिणीवरून शिवीगाळ केली.

त्यानंतर आरोपींनी त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यात सिमेंट गटटू आणि काठीने हल्ला केला. त्याला खाली पाडून लाथा-बुक्क्यांनीही मारहाण केली. या हल्ल्यात विजय कुर्मी गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांची कारवाई

याप्रकरणी, पोलिसांनी आरोपी साहिल जानराव, सार्थक कागदे आणि आसिफ खान यांना अटक केली आहे. अल्पवयीन आरोपी जावेद शेखलाही ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींवर संत तुकाराम नगर पो.स्टे. गु.र.नं. ३३१/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९(१), ११५(२), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक आटे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post