Chinchwad : ‘चित्रपटाची स्टोरी सांगू नका’ म्हटल्याने वाद, चिंचवडमधील थिएटरमध्ये पती-पत्नीला मारहाण!


 पुणे, ९ सप्टेंबर: पुणे जिल्ह्यातील चिंचवड (Chinchwad) येथे एका थिएटरमध्ये (Theatre) चित्रपट पाहताना ‘स्टोरी सांगू नका’ असे म्हटल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका जोडप्याने बाप-लेकावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत दोघेही जखमी झाले आहेत.

काय आहे प्रकरण?

ही घटना ५ सप्टेंबर, २०२५ रोजी रात्री ८.३० ते ९.४५ वाजताच्या दरम्यान चिंचवडमधील एलप्रो मॉल, आयनॉक्स थिएटरमध्ये घडली. फिर्यादी अभिषेक प्रफुल्ल देशपांडे (वय २९) यांनी चिंचवड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी त्यांची पत्नी आणि बहिणीसोबत ‘कॉन्यूरिंग’ हा चित्रपट पाहत होते.

त्यांच्या मागील सीटवर बसलेला आरोपी अकिब जावेद निसार पटेल (Akib Patel) हा चित्रपटाची स्टोरी सांगत होता. यामुळे त्रास होत असल्याने फिर्यादीने त्याला, "सर, तुम्ही स्टोरी अगोदर सांगू नका, थोडं शांत बसा," असे सांगितले. मध्यंतरात आरोपीने फिर्यादीकडे पाहून आपल्या पत्नीला, "इसके बाप का क्या जाता है," असे म्हटले.

फिर्यादीने त्याच्याकडे पाहिले असता, त्याला राग आला. तो जागेवरून उठून फिर्यादीची कॉलर पकडून त्याला हाताने मारहाण करू लागला. त्याने त्याला खाली पाडून लाथेने डाव्या हाताच्या दंडावर, चेहऱ्यावर आणि पोटावर मारले, ज्यामुळे तो जखमी झाला. भांडण सोडवण्यासाठी फिर्यादीची पत्नी प्रचिती मध्ये आली असता, आरोपीने तिलाही मारहाण केली. आरोपी आणि त्याच्या पत्नीने दोघांनाही शिवीगाळ केली.

या प्रकरणी, चिंचवड पोलिसांनी आरोपी अकिब जावेद निसार पटेल आणि त्याच्या पत्नीविरुद्ध चिंचवड पो.स्टे. गु.र.नं. ३०८/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ११७(२), ११५(२), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अद्याप फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post