‘गाडीला धडक का मारली?’ विचारताच रिक्षाचालकाचा कॅब चालकावर जीवघेणा हल्ला Rickshaw driver fatally attacks cab driver


पुणे, ६ सप्टेंबर:
पुणे-हिंजवडीमधील विप्रो सर्कलजवळ एका क्षुल्लक वादातून रिक्षाचालकाने कॅब चालकावर स्टीलची पट्टी आणि हातातील कड्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात कॅब चालक गंभीर जखमी झाला असून, हिंजवडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.Rickshaw driver fatally attacks cab driver

काय आहे प्रकरण?

हा प्रकार ४ सप्टेंबर, २०२५ रोजी रात्री १.४५ वाजताच्या सुमारास हिंजवडी फेज २ मधील विप्रो सर्कल येथे घडला. फिर्यादी अंकुश हरिचंद्र जाधव (वय ३२), जे कॅब चालक म्हणून काम करतात, यांनी हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश पांडुरंग खाणेकर याने चालवत असलेल्या रिक्षाची धडक फिर्यादीच्या गाडीला लागली.

जेव्हा फिर्यादी अंकुश जाधव यांनी “तू माझ्या गाडीला धडक का मारली?” अशी विचारणा केली, तेव्हा आरोपी महेश खाणेकर चिडून गेला. रागाच्या भरात त्याने आपल्याकडील स्टीलच्या पट्टीने फिर्यादीच्या मनगटावर आणि दोन्ही पायांच्या मांडीवर मारहाण केली. तसेच, त्याने हातातील कड्याने फिर्यादीच्या डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले.

मारहाण करताना आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली आणि “तुला बघून घेतो,” अशी धमकीही दिली. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.

या प्रकरणी, पोलिसांनी आरोपी महेश खाणेकर याच्याविरोधात हिंजवडी पो.स्टे. गु.र.नं. ६४०/२०२५, भा.न्या. संहिता कलम ११८(१), ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक सावंत या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post