Pune News:अघोरी विधी साठी तरुणीला मंदिरात बोलवले ,पेढ्यातून दिले गुंगीचे औषध आणि बाबा ३ लाखाचे दागिने घेऊन पळाला !

 

 Pune News ‘अघोरी विधी’च्या नावाखाली महिलेची ३ लाखांची फसवणूक; तांत्रिकाला अटक

पुणे, १० सप्टेंबर: पुण्यात ‘अघोरी विधी’ आणि जादूटोण्याच्या नावाखाली एका महिलेची १ लाख २० हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांसह एकूण ३ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक (Fraud) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सहकारनगर पोलिसांनी या प्रकरणी एका तांत्रिकाला अटक केली असून, त्याचा साथीदार फरार आहे.

काय आहे प्रकरण?

ही घटना २८ जुलै ते ९ सप्टेंबर, २०२५ या कालावधीत बालाजीनगर (Balajinagar) येथील अवंतिका सोसायटीमध्ये घडली. या प्रकरणी एका २६ वर्षीय महिलेने सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गिरीश बलभीम सुरवसे (वय ३६) याने तिचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर, आरोपीने तिला मंदिरात नेऊन अघोरी विधी (Aghori ritual) केले. या विधीदरम्यान, आरोपीने तिला कसलातरी अंगारा पेढ्यातून खाण्यास दिला. त्यानंतर, आरोपीने फिर्यादीची १,२०,००० रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला. चोरी झालेल्या ऐवजाची एकूण किंमत ३,१५,००० रुपये आहे.

या प्रकरणी, पोलिसांनी आरोपी गिरीश बलभीम सुरवसे याला तात्काळ अटक केली आहे. त्याच्यासोबत असलेला दुसरा आरोपी अजूनही फरार आहे. आरोपींवर सहकारनगर पो.स्टे. गु.र.नं. ३८४/२०२५, भा.न्या.सं.क. ३१८(४), ३१६(२), ३(५) आणि महाराष्ट्र नरबळी जादूटोना प्रतिबंधक अधिनियम ३(२)(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post