पुणे, ५ सप्टेंबर: पुणे जिल्ह्यातील तळेगाव-चाकण रोडवर एका भीषण अपघातात (Accident) २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात मोटरसायकल चालकाने पाठीमागून जोरदार धडक दिल्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.Hit-and-run incident in Talegaon
काय घडले?
हा अपघात २ सप्टेंबर, २०२५ रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास माळवाडी गावाच्या हद्दीत, डी.ओ.डी. डेपोसमोर घडला. मयत तरुणाचे नाव सौरभ नायकडे (वय २२) असे आहे, जो माळवाडी येथील रहिवासी होता. या प्रकरणी त्याचे काका नागनाथ महादेव नायकडे (वय ४९) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
अधिक माहिती साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ त्याच्या स्कूटीवरून तळेगावच्या दिशेने जात होता. त्याचवेळी, एमएच १२ जेआर ८१९२ क्रमांकाच्या करिष्मा मोटरसायकलवरील अज्ञात चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगाने येऊन त्याच्या स्कूटीला जोरदार धडक दिली.
या धडकेत सौरभच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर आरोपी मोटरसायकल चालक कोणताही मदत न करता किंवा पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून फरार झाला.
या प्रकरणी पोलिसांनी तळेगाव एमआयडीसी पो.स्टे. गु.र.नं. १८९/२०२५, भा.न्या.सं. कलम २८१, १२५(ए)(बी), १०६ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक रेळेकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत आणि आरोपीचा शोध घेत आहेत.
अधिक माहिती साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा