PCMC "मुरगम्मा के साथ बात क्यु किया, मै तुमको अभी जिंदा नही छोडूंगा," असे म्हणत मित्रावर चाकूने हल्ला; आरोपीला अटक


थेरगावात धक्कादायक घटना: संशयावरून मित्रावर चाकूने हल्ला; आरोपीला अटक

पुणे, ०५ ऑगस्ट २०२५: थेरगाव (pcmc news )येथे संशयाच्या एका क्षुल्लक कारणावरून एका मित्राने दुसऱ्या मित्रावर भाजी कापण्याच्या चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. यात फिर्यादी गंभीर जखमी झाला असून, पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.PCMC News 


नेमकी काय घडली घटना?

शनिवार (दि. ०२ ऑगस्ट २०२५) रोजी दुपारी ३:०० वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. थेरगाव येथील नखातेनगरमधील, स.नं. ५/४ येथे असलेल्या सारिका संतोष सुगवे यांच्या खोलीत हा प्रकार घडला.

फिर्यादी दिलीप हुलराम सूर्यवंशी (वय २४, नोकरी) आणि आरोपी सेलवराज अहंडी थेवर (वय ५१) हे दोघे एकत्र गप्पा मारत बसले होते. त्यावेळी, दिलीप हा 'मुरगम्मा' नावाच्या महिलेशी बोलत असल्याचे सेलवराजला दिसले. याचा त्याला राग आला.

रागाच्या भरात सेलवराजने दिलीपशी वाद घालण्यास सुरुवात केली. "मुरगम्मा के साथ बात क्यु किया, मै तुमको अभी जिंदा नही छोडूंगा," असे म्हणत त्याने शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता, जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याने जवळच असलेला भाजी कापण्याचा चाकू घेतला. त्या चाकूने त्याने दिलीपच्या डोक्यावर, डाव्या हातावर आणि उजव्या पायाच्या पोटरीवर वार केले. यात दिलीप गंभीर जखमी झाला.


पोलिसांची कारवाई

या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३१७/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम १०९ (१), ३५२ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी सेलवराज अहंडी थेवर याला अटक केली आहे. संशयावरून झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. काळेवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post