पुणे गणेशोत्सव २०२५: मध्यवर्ती भागातील ‘या’ १२ रस्त्यांवर जड वाहनांना बंदी । Heavy vehicles banned on these 12 roads in Pune Ganeshotsav central area

  

पुणे शहर पोलीस आयुक्तलयाच्या वाहतूक शाखेने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील प्रमुख १२ रस्त्यांवर जड आणि अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.Heavy vehicles banned on these 12 roads in Pune Ganeshotsav central area


पोलीस उप-आयुक्त हिंमत जाधव यांनी या संदर्भात आदेश जारी केले आहेत. गणेशोत्सवादरम्यान खरेदीसाठी आणि गणपतीचे देखावे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक बाहेर पडतात. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जड वाहनांमुळे अपघात होऊ नये आणि वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.


ही बंदी २५ ऑगस्ट २०२५ पासून ते गणपती विसर्जन (०७ सप्टेंबर २०२५) पर्यंत २४ तास लागू असणार आहे.


या रस्त्यांवर जड वाहनांना प्रवेश नाही

या आदेशानुसार, खालील प्रमुख रस्त्यांवर जड आणि अवजड वाहनांना प्रवेश करता येणार नाही:


शास्त्री रोड (सेनादत्त चौकी चौक ते अलका चौक)


टिळक रोड (जेधे चौक ते अलका चौक)


कुमठेकर रोड (शनिपार ते अलका चौक)


लक्ष्मी रोड (संत कबीर चौक ते अलका चौक)


केळकर रोड (फुटका बुरुज ते अलका चौक)


बाजीराव रोड (पूरम चौक ते गाडगीळ पुतळा)


शिवाजी रोड (गाडगीळ पुतळा ते जेधे चौक)


कर्वे रोड (नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक)


फर्ग्युसन कॉलेज रोड (खंडोजीबाबा चौक ते वीर चाफेकर चौक)


जंगली महाराज रोड (स.गो. बर्वे चौक ते खंडोजीबाबा चौक)


सिंहगड रोड (राजाराम ब्रिज ते सावरकर चौक)


गणेश रोड / मुदलियार रोड (पॉवरहाऊस दारुवाला, जिजामाता चौक ते फुटका बुरुज चौक)


या आदेशातून काही वाहनांना सूट देण्यात आली आहे. यामध्ये फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आणि गणेश देखाव्यांची वाहतूक करणारी वाहने यांचा समावेश आहे.


या वाहतूक नियमांचे पालन करून गणेशोत्सव शांततेत आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पुणेकर नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post