पिंपरीतील ICICI बँकेत बनावट नोटांचा सुळसुळाट; लाखोंची रोकड जमा करताना प्रकार उघडकीस!

 

पिंपरीतील ICICI बँकेत बनावट नोटांचा सुळसुळाट; लाखोंची रोकड जमा करताना प्रकार उघडकीस

पिंपरी, दि. १२ ऑगस्ट - शहरातील पिंपरी येथील ICICI Bank च्या ऑटोक्लस्टर शाखेत ₹80,100 जमा करताना बनावट नोटा (Fake notes) आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. बँकेतील cash sorting machine मध्ये या नोटा (Indian currency notes) तपासताना त्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गु. रजि.नं. २८७/२०२५ भा.न्या.सं. कलम १७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



ही घटना २० मार्च २०२५ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. ICICI बँकेचे डेप्युटी मॅनेजर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आनंद सुरेश गांधी यांच्या आनंद मेडिको या होलसेल मेडिकल दुकानात काम करणारे भास्कर सखाराम खोपकर हे बँकेत पैसे जमा करण्यासाठी आले होते. त्यांच्याकडे ₹८०,१००/- ची रोकड होती. ही रक्कम बँकेच्या कॅशियर प्रवीण विवेक क्षीरसागर यांनी स्वीकारली आणि Glory cash sorting machine मध्ये टाकली. याचवेळी, ₹२००/- च्या एकूण ९ बनावट नोटा असल्याचे मशीनने दर्शवले.



या घटनेनंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ आनंद गांधी यांच्याशी संपर्क साधून चौकशी केली. आनंद गांधी यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांचे आनंद मेडिको नावाचे होलसेल दुकान आहे आणि ते अंदाजे ९० ते १०० रिटेलर दुकानदारांना औषधे विकतात. त्यामुळे या बनावट नोटा नेमक्या कोणाकडून आल्या याची त्यांनाही निश्चित माहिती नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे शहरात बनावट नोटांचे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post