सोन्याचे दागिने पिशवीत ठेवण्यास सांगून ७५ वर्षीय महिलेची फसवणूक । Woman cheated in Hadapsar

 


सोन्याचे दागिने पिशवीत ठेवण्यास सांगून ७५ वर्षीय महिलेची फसवणूक

पुणे: हडपसर परिसरात एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने 'श्रीमंत माणूस' साड्या आणि पैसे वाटत असल्याचे सांगून महिलेचा विश्वास जिंकला आणि तिच्याकडील ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला.Woman cheated in Hadapsar

नेमकं काय घडलं?

१४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता ही घटना हडपसरमधील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयाजवळील बोळीमध्ये घडली. हडपसर येथे राहणाऱ्या एका ७५ वर्षीय महिलेने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

महिला पायी जात असताना, एका अनोळखी इसमाने तिला गाठले. त्याने सांगितले की, 'एका श्रीमंत माणसाला मुलगा झाला असून, तो साड्या, धान्य आणि पैसे वाटत आहे.' हे ऐकून महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवला.

हातचलाखीने दागिने लंपास

त्यानंतर, आरोपीने महिलेला तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून एका पिशवीत ठेवण्यास सांगितले, जेणेकरून वाटप करताना ते सुरक्षित राहतील. महिलेने दागिने पिशवीत ठेवताच, आरोपीने हातचलाखी करून ती पिशवी घेऊन पळ काढला.

या पिशवीत ६५,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने होते. महिलेला फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने तातडीने पोलिसांशी संपर्क साधला.

Post a Comment

Previous Post Next Post