नेमकी घटना काय?
ही घटना ३० एप्रिल २०२२ ते १६ ऑगस्ट २०२३ या कालावधीत घडली. चाकणमधील आंबेठाण चौकात असलेल्या 'आदिराज मॅनपॉवर सर्विसेस प्रा. लिमिटेड' या कंपनीमध्ये ही फसवणूक झाली.
फिर्यादी राजेंद्र दत्तात्रय गोरे (वय ५०) यांच्या कंपनीमध्ये आरोपी सिद्धाराम बसवराज रड्ढे हा सुपरवायझर म्हणून, तर विनोद भाऊसाहेब आगरकर हा अकाउंटंट म्हणून काम करत होते.
सुपरवायझर सिद्धारामने अधिक पैसे कमवण्याच्या उद्देशाने अकाउंटंट विनोदला आपल्या कटात सामील करून घेतले. दोघांनी संगनमत करून कंपनीच्या 'रजा रोखीकरणाच्या' (Leave Encashment) बिलांमध्ये बोगस कामगारांची (Bogus Workers) नावे टाकली. या बिलांना मंजुरी मिळवून त्यांनी पैसे काढले.
बनावट कागदपत्रे आणि खोटा हिशोब
या आरोपींनी बनावट कागदपत्रे आणि खोटे हिशोब तयार केले. या माध्यमातून त्यांनी कंपनीची एकूण २५ लाख ४८ हजार ४९० रुपये इतकी मोठी आर्थिक फसवणूक केली.