
दुकानात घडली. याप्रकरणी राहटणी येथील ५८ वर्षीय दुकानदाराने चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी त्यांच्या दुकानात असताना, तीन अनोळखी व्यक्ती दुकानात घुसल्या. त्यांनी हत्यार दाखवून, 'दुकानातील सर्व माल आणि रोख रक्कम आमच्याकडे दे,' अशी मागणी केली. दुकानदाराने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्याला मारहाण केली.
लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून पसार
दरोडेखोरांनी दुकानदाराला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केली. मात्र, दरोड्याचा प्रयत्न असफल ठरल्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्यात दुकानदार जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू
या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०९ (६), ३५१ (२) आणि म.पो.का. कलम ३७ (१), १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.