सायबर फसवणूक: अमेरिकेत राहणाऱ्या तरुणाची ४५ लाखांची फसवणूक । American youth cheated

 


पुणे: कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायबर फसवणुकीचा एक मोठा प्रकार समोर आला आहे. अमेरिकेमध्ये राहणाऱ्या एका तरुणाला वेगवेगळ्या फोन नंबरवरून संपर्क साधून आणि सायबर गुन्हेगार असल्याचे भासवून तब्बल ४५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

नेमकं काय घडलं?

या प्रकरणी देवमाळी, परतवाडा (अमरावती) येथील ७० वर्षीय व्यक्तीने फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी यांचा मुलगा अमेरिकेत राहत असताना, त्याला वेगवेगळ्या अनोळखी फोन नंबरवरून फोन आले. फोन करणाऱ्यांनी त्याला सांगितले की, त्याच्या नावावर भारतात आधारकार्ड आणि सिमकार्डचा वापर करून अनेक बँक खाती उघडण्यात आली आहेत.

या खात्यांचा वापर बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांसाठी केला जात आहे, अशी धमकी त्याला देण्यात आली. आरोपींनी स्वतःला मुंबई सायबर क्राईमचे अधिकारी असल्याचे भासवून त्याला अमेरिकन बँक खाती अवैध व्यवहारांसाठी वापरली गेल्याचे सांगितले.

धमकी देऊन फसवणूक

या धमक्यांना घाबरून तरुणाने आरोपींनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या बँक खात्यात ४५ लाख रुपये हस्तांतरित केले. त्यानंतर, त्याला फसवणूक झाल्याचे लक्षात आले.


Post a Comment

Previous Post Next Post